Breaking News

नियोजन विभागाचे काम आता पेपरलेस

अलिबाग : प्रतिनिधी

नियोजन विभागाचा संपुर्ण कारभार पेपरलेस करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. जिल्हा नियोजन विभागाचे कामकाज संगणकीय कार्यप्रणालीच्या आधारे कार्यान्वयीत केले जाणार आहे. नियोजन विभागाचे कामकाज 1एप्रिलपासून पेपरलेस होणार आहे. त्यामुळे कुठलीही फाईल निरनिराळ्या विभागात फिरवण्याची गरज भासणार नाही. ही सर्व काम आता एका क्लिकवर होणार आहेत. परिणामी या विभागाचे काम गतिमान होईल.

रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी आणि जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव यांनी यासंदर्भात नुकतीच नियोजन विभागाशी निगडीत सर्व यंत्रणांची एकत्रित बैठक घेतली. त्यात आय-पास प्रणाली बाबत माहिती देण्यात आली. 9 ते 28 डिसेंबर या कालावधीत आय-पास प्रणालीच्या वापराबाबत संबधित अधिकारी आणि कर्मचार्‍यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.

नियोजन विभागातील कामकाज पेपरलेस करण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे. यासाठी इंटिग्रेटेड प्लानिंग ऑफीस ऑटोमेशन प्रणाली विकसित करण्यात आली आहे.   आय- पास नावाची संगणकीय यंत्रणा राज्यभरात कार्यान्वयीत केली जाणार आहे. नियोजन विभागातील टपालांचे व्यवस्थापन, कामांचे संनियंत्रण, कामाचे भौगोलिक स्थान, कामांचे प्रस्ताव प्राप्त झाल्यापासून, ते पुर्ण होईपर्यंतची अद्ययावत स्थिती, निधीचे व्यवस्थापन, विविध स्तरांवरील डॅशबोर्ड यांचा समावेश या प्रणालीत असणार आहे.

नियोजन विभागाचा कारभार ऑनलाईन पध्दतीने करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे कुठलीही फाईल निरनिराळ्या विभागात फिरवण्याची गरज भासणार नाही. सर्व काम आता एका क्लिकवर होणार आहेत. त्यासाठी पुढील महिन्यात सर्व विभागातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांना प्रशिक्षण दिले जाईल. 1 एप्रीलपासून ही यंत्रणा कार्यान्वीत होईल.

-सुनील जाधव, जिल्हा नियोजन अधिकारी, रायगड

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply