Breaking News

पाली येथे सायरनमुळे दरोड्याचा प्रयत्न फसला

पाली : प्रतिनिधी

रायगड जिल्ह्यात चोर्‍या व घरफोड्यांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत असताना पाली येथे एका ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न फसल्याची घटना घडली आहे. दरोडा टाकताना कुलपाला लावलेला सायरन वाजल्याने दरोडेखोरांचीच भंबेरी उडून त्यांनी तेथून पळ काढला. हा फसलेला दरोडा सीसीटीव्ही कॅमेर्‍यात टिपला गेला आहे. 

पाली बाजारपेठेत मुख्य रहदारीच्या मार्गालगत सराफ व्यावसाईक सागर परमार यांच्या लुब्धी ज्वेलर्स या दुकानावर दरोडा टाकण्याच्या उद्देशाने पाच जण बुधवारी (दि. 27) पहाटे 3.30च्या सुमारास तेथे आले होेते. या वेळी त्यांनी कुलपाला हात लावताच सायरन जोरजोरात वाजण्यास सुरुवात झाली. त्यामुळे दरोडेखोरांचा बेत फसला आणि त्यांनी लगबगीने वाहनात बसून पळ काढला.  या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Check Also

आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्तआंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक तथा खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद कदम …

Leave a Reply