Breaking News

चौक गुरुकुलमध्ये क्रीडा महोत्सव उत्साहात

मोहोपाडा : प्रतिनिधी

चौक येथील श्री स्वामीनारायण गुरुकूल इंटरनॅशनल स्कूलचा वार्षिक क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात झाला. या महोत्सवाचे उद्घाटन राकेश तिवरेकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर खेळ, खेळातील शिस्त आणि खिलाडूवृत्ती राखण्याची शपथ उपस्थित विद्यार्थ्यांना शाळेचा  स्पोर्ट्स कॅप्टन मास्टर शेल सणस याने दिली.        

अ‍ॅथलेटिकस, बास्केटबॉल फुटबॉल क्रिकेट, कबड्डी, त्याचबरोबर बुद्धिबळ, कॅरम अशा एकूण 38 क्रीडा प्रकारच्या स्पर्धांमध्ये  छोटा शिशु ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांनी आपल्यात असलेले सुप्त गुण दाखवत क्रीडा महोत्सवामध्ये छाप सोडली.

विजेत्यांना योगेश्वरदासजी स्वामी, आत्मस्वरूपदासजी स्वामी, जॉन्सन यांच्या हस्ते  पदक व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

Check Also

कॉमनवेल्थ सुवर्णपदक विजेती स्वस्तिका घोषचा लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार

पनवेल : रामप्रहर वृत्तकॉमनवेल्थ स्पर्धेतील टेबल टेनिस चॅम्पियनशिप २०२६मध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत पनवेलच्या स्वस्तिका …

Leave a Reply