मोहोपाडा ः वार्ताहर
कानसा वारणा फाऊंडेशन, ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन आणि महाराष्ट्र युनिव्हर्सिटी स्टूडंट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी सत्यशोधक अण्णाभाऊ साठे विद्यार्थी युवा साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात झाले. या कार्यक्रमाला मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली होती. कार्यक्रमाचे उदघाटन जेष्ठ नाटककार राजाभाऊ शिरगुप्पे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी जेष्ठ साहित्यिक अजय कांडर यांच्या सह जेष्ठ विचारवंत विजयकुमार जोखे, डॉ. चंद्रकुमार नालगे उपस्थित होते. शाहिर अलम रमजान पटवेगार बागणीकर यांच्या शाहिरी कार्यक्रमाने सुरुवात झाली. दरम्यान अण्णाभाऊ साठेचे विचार व विद्यार्थी युवकांची जबाबदारी यावर परिसंवादाचा कार्यक्रम झाला. यानंतर कथाकथनाचा कार्यक्रम होवून कविसंमेलनाचा कार्यक्रम झाला. यावेळी कानसा वारणा फाऊंडेशनचे संस्थापक वावर्ले चौक येथील दिपक पाटील, सरपंच कृष्णा पाटील, भाई पाटील, सर्जेराव पाटील पेरीडकर, आनंदराव माइंगडे, हंबीरराव पाटील, दिलिप पाटील, गणपती कांबळे, प्रकाश नाईक, बालासाहेब नायकवाडी, हरीष कांबळे आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.