पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयामध्ये संविधान गौरव दिन मोठ्या उत्साहात झाला. या वेळी उपस्थित सर्व प्राध्यापक व छात्रप्राध्यपकांनी संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन केले. या कार्यक्रमात छात्राध्यापक राजू कोळी, चंद्रकांत परकाले, छात्राध्यापक मंदार लेले, प्रा.डॉ.नीलिमा अरविंद मोरे, जेष्ठ प्राध्यापिका डॉ. सुनीता लोंढे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. छात्राध्यापिका स्मिता पाटील हिने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर नीता वायडा हिने आभार व्यक्त केले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापिका संजीवनी पैठणकर, महाविद्यालयातील कर्मचारी वृंद तसेच शासकीय अल्पसंख्याक मुलींच्या वसतिगृहातील कर्मचारी व विद्यार्थिनी कार्यक्रमास उपस्थित होत्या. महाविद्यालयातील इंद्रायणी कुलाचे मार्गदर्शक डॉ. रमेश भोसले व कुलातील सर्व सभासद छात्राध्यापकांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुरेख नियोजनाद्वारे परिश्रम घेतले.