Breaking News

गौरव पुरस्कारांनी श्रीराम महाजन सन्मानित

नवी मुंबई ः वार्ताहर

मुंबई येथील सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड यांच्या वतीने राज्यस्तरीय कर्मवीर भाऊराव पाटील आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार 2019 चेंबूर कर्नाटका हायस्कूलचे कलाशिक्षक श्रीराम साहेबराव महाजन यांना देण्यात आला.

परळच्या दामोदर सभागृहांमध्ये झालेल्या कार्यक्रमात श्रीराम महाजन यांच्यासह महाराष्ट्रातून 36 शिक्षकांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. हा पुरस्कार ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ (माई) व संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते देण्यात आला. पुरस्कार स्वरूप स्मृतिचिन्ह प्रशस्तिपत्र श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. महाजन यांनी केलेल्या कला, शैक्षणिक व सामाजिक कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच मुंबईच्या आनंदश्री ऑर्गनायझेशन यांच्याकडून महात्मा गांधीजी यांच्या 150 व्या सुवर्णमहोत्सव जन्मशताब्दीनिमित्त प्रमुख अतिथी रियल जीवनातील गांधीगिरीचे मुन्नाभाई लक्ष्मण गोरे यांच्या हस्ते श्रीराम महाजन यांना राष्ट्रीय पातळीवरील महात्मा गांधी दर्शन पुरस्कार 2019 सन्मानपूर्वक देण्यात आला. या पुरस्कारासाठी संपूर्ण भारतातून फक्त 45 पुरस्कारांची निवड करण्यात आली होती. त्यामध्ये श्रीराम महाजन यांची निवड करण्यात आली.  महाजन हे  कामोठे येथील रहिवासी असून सध्या ते चेंबूर येथील कर्नाटक हायस्कूलमध्ये कलाशिक्षक म्हणून कार्यरत आहेत.

Check Also

चित्रपटाचे यश अन् सेलिब्रेशन

चित्रपट सुपर डुपर हिट होण्यातील सर्वात महत्त्वाचा घटक अर्थात प्रेक्षक. या प्रेक्षकांना चित्रपट आवडला रे …

Leave a Reply