Breaking News

जमिनीच्या आमिषाने सहा लाखांची फसवणूक

पनवेल ः बातमीदार

बदलापूर येथे कर्जत रोडला पेट्रोलपंपासमोर 4 गुंठे जागा 25 लाख रुपयांत देतो, असे सांगून 50 वर्षीय इसमाकडून सहा लाख रुपये घेऊन त्यांची फसवणूक करण्यात आली आहे. दत्तात्रय दामोदर पाटील असे फिर्यादीचे नाव असून ते घोट येथील रहिवासी आहेत. आरोपीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दत्तात्रय दामोदर पाटील यांना दिनेश रामचंद्र भोईर (नेरळ, ता. कर्जत) यांनी जमीन विक्री करावयाची असल्याचे सांगितले. नवीन पनवेल येथे दोघांची भेट झाली व त्याची शिरगांव, बदलापुर येथे कर्जत रोडला पेट्रोलपंपासमोर 4 गुंठे जागा असुन तिची किंमत 6 लाख रु. गुंठा प्रमाणे आहे. त्यावेळी दिनेश यांनी पाटील यांना  सदरची जागा दाखवली. सदरची जागा पाटील यांना पसंत पडल्याने तेसदरचा व्यवहार करण्यास तयार झाले. त्यावेळी दत्तात्र्ये पाटील यांनी दिनेश भोईर यांचेकडे जागेच्या मालकीबाबतचे कागदपत्रे विचारले असता त्याने त्यांचे जवळील त्याचे नावांवर असलेले स्वतःच्या मालकीची जमीन ही सर्वे नं 32/1/ ए प्लाँट नं 3 गांव शिरगांव ता. अंबरनाथ, ठाणे या जमीनीच्या 7/12 उतार्‍याची प्रत दाखविली. सदरचा 7/12 उतारा योग्य वाटल्याने पाटील यांनी  ही जमीन विकत घेण्याचे ठरवले. व जागेचा व्यवहार व रजिस्ट्रेशन असे 25 लाख रुपयास व्यवहार ठरला. जागेच्या व्यवहारापोटी 6 लाख रुपये देण्यात आले. उर्वरीत 19 लाख रुपये अँग्रीमेंट रजिस्ट्रेशन करुन व्यवहार पुर्ण होईल त्यावेळी द्यावयाची ठरले. ठरलेल्या व्यवहारानुसार तेथील नोटरी रजिस्टर यांचेकडे 100 रुपयांचे स्टँम्प पेपरवर करारनामा करुन तो नोटरी पाटील यांनी रजिस्टर करुन घेतला. त्यावेळी करारनाम्याची झेराँक्स प्रत दिनेश भोईर याने पाटील यांना दिली. सदरचा व्यवहार झाल्यानंतर या जागेचा सर्व्हे करण्यासाठी दत्तात्रेय पाटील गेले असता या ठिकाणी असलेल्या रहिवांशी यांचेकडुन हीजागा ही दिनेश भोईर यांची नसल्याचे समजले. म्हणुन पाटील यांनी दिनेश भोईर यास त्याचे मोबाईलवर संपर्क साधला असता त्याचा फोन बंद आला. त्याच्या घरी गेल्यानंतर तो घरी देखील सापडला नाही. त्यामुळे त्याच्याविरोधात खांदेश्वर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

मारहाणीचा गुन्हा दाखल

शहरातील 33 वर्षीय इसमाला 20 ते 25 वयोगटातील एक महिला व 3 पुरुषांनी बांबू, प्लास्टिकचा पाईप, वीट, पीओपीचा सीटचा तुकडा व ठोशाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. शहर पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

लक्ष्मण जोगेश्वर महतो (33) हे जेवण करत असताना बिल्डिंगखाली मुन्ना, मुन्ना, असा आवाज एक महिला देत होती. त्यावेळी महतो खाली आले असता 20 ते 25 वर्षे  वयोगटातील एक मुलीने विचारले की, मुन्ना किधर है? त्यावर मुन्ना इथे राहत नसल्याचे सांगत असताना 3 मुलांनी  व एक महिलाने महतो यांना ठोशाबुक्क्यांनी मारण्यास सुरुवात केली. त्यावेळी मुन्ना येथेच लपला आहे.

तूच त्याला लपवले आहे, असे म्हणून त्यांनी तेथे पडलेल्या साहित्याने महतो यांना मारहाण केली. त्यांच्या डोक्यात वीट मारल्याने डोक्यास व भुवईवर जखम झाली आहे. पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.

Check Also

विरोधकांकडून होणारा अपप्रचार खोडून काढा; लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

पनवेल ः रामप्रहर वृत्त लोकसभा निवडणुकीप्रमाणे या विधानसभा निवडणुकीतही विरोधकांकडून स्वार्थापोटी खोटा प्रचार करून जनतेची …

Leave a Reply