Breaking News

‘रयत’साठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे सातत्याने पाठबळ

आमदार दिलीप-वळसे पाटील यांचे गौरवोद्गार

पनवेल : रामप्रहर वृत्त
रयत शिक्षण संस्थेच्या बाबतीत माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर हे सहकार्य करण्यासाठी कधीही मागे राहत नाहीत. सतत त्यांचा हात वाढताच असतो, असे गौरवोद्गार राज्याचे माजी गृहमंत्री तथा ‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य आमदार दिलीप वळसे-पाटील यांनी शुक्रवारी (दि. 9) कामोठे येथे काढले.
रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचा 12 डिसेंबर रोजी 82वा वाढदिवस आहे. दुग्धशर्करा योग म्हणजे रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सभासदत्व अध्यक्ष शरद पवार यांना प्राप्त झाल्यास यंदा 50 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त कृतज्ञता सप्ताह साजरा केला जात आहे. त्या अंतर्गत कामोठे येथील माजी आमदार दत्तूशेठ पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये रायगड विभाग कामोठे पनवेलच्या वतीने 40 हजार स्क्वेअर फुटी महारांगोळी तसेच खुल्या गटातील रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा व पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांचे उद्घाटन आमदार दिलीप-वळसे पाटील यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते.
या उपक्रमास रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर, संस्थेचे रायगड विभागीय चेअरमन आमदार बाळाराम पाटील, जनरल बॉडी सदस्य जे. एम. म्हात्रे, महेंद्र घरत, महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर, नावडे आयटीआयचे चेअरमन बाळाराम खुटारकर, स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन एकनाथ पाटील, ‘रयत’चे रायगड विभाग सहाय्यक अधिकारी एस. एस. फडतरे, रायगड विभागीय अधिकारी आर. पी. ठाकूर यांच्यासह स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य, पदाधिकारी, शिक्षक उपस्थित होते.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply