Breaking News

पनवेल : मराठी मातीतला रांगडा खेळ म्हणून कुस्ती ओळखली जाते. रायगड जिल्ह्यात कबड्डीपाठोपाठ कुस्ती मोठ्या प्रमाणात खेळली जाते. अनेक खेळाडू या खेळात कौशल्य दाखवत आहेत. अशाच प्रकारे नितळस येथील सचिन भोपी यांची पुणे येथे होणार्‍या महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेत निवड झाली आहे. याबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सचिन यांचे शुक्रवारी अभिनंदन केले आणि स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, पनवेल तालुका कुस्तीगीर संघटनेचे सरचिटणीस योगेश लहाने आदी उपस्थित होते.

Check Also

भारत टॅक्सी सेवा प्रवासी आणि चालकांसाठी नवा अध्याय -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पनवेल ः रामप्रहर वृत्तसहकारी तत्त्वावरील भारत टॅक्सी सेवा प्रवासी आणि चालकांसाठी एक नवा अध्याय असून …

Leave a Reply