Breaking News

मुलीची हत्या करणार्या क्रूर बापाला जन्मठेप

माणगाव जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

माणगाव : प्रतिनिधी

आपल्या पोटच्या मुलीची हत्या केल्याप्रकरणी निर्दयी बापास माणगाव जिल्हा व सत्र न्यायालयाने शुक्रवारी (दि. 13) जन्मठेपेची शिक्षा सुनावली. राम हरी जाधव असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव असून, त्याने पाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोलथरे गावाच्या जंगलात ऑक्टोबर 2018मध्ये मुलीची हत्या केली होती. आरोपी राम हरी जाधव (रा. दहीगाव आदिवासीवाडी, ता. सुधागड) याचे लग्न गेली 15 वर्षांपूर्वी त्याचा मामा राम बाळू पवार यांची मुलगी कुसुम हिच्याबरोबर झाले होते. राम पवार याने त्याला झाप येथे घरजावई म्हणून ठेवले होते. आरोपी राम जाधव याला सहा मुले होती. 17 ऑक्टोबर 2018 रोजी राम याने दारू पिऊन पत्नीशी भांडण केले व 18 ऑक्टोबरच्या रात्री लहान मुलगी शालू (वय 4) हिला घेऊन तो कोळथरे गावाच्या जंगलात पोहचला. तेथे त्याने सोबत आणलेल्या धारधार लोखंडी कोयत्याने शालू हिचा गळा कापून तिला जीवे ठार मारले. या प्रकरणी पाली पोलीस ठाण्यात राम जाधव याच्यावर  भादंवि संहिता कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या खटल्याची सुनावणी माणगाव सत्र न्यायालयात झाली. न्या. टी. एम. जहागीरदार यांनी आरोपी राम हरी जाधवला दोषी ठरवून जन्मठेप व 10 हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली.

Check Also

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे -आमदार प्रशांत ठाकूर

खारघरमध्ये पर्यावरणपूरक शवदाहिनीचे लोकार्पण, प्राणी अंत्यसंस्कार केंद्राचे भूमिपूजन खारघर ः रामप्रहर वृत्तपर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपण …

Leave a Reply