Breaking News

गुन्हे प्रकटीकरण शाखेतर्फे अन्नधान्य

पनवेल : पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथक व श्री स्वामी समर्थ मठ मानघर यांच्या संयुक्त विद्यमाने परिसरातील गरजवंतांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. या परिसरात असलेल्या गराडा, बेलवाडी, नानोशी, मोसार, तांबटवाडी येथील 250 गरजू आदिवासी बांधवांना अन्नधान्याचे सामान पोलीस उपनिरीक्षक सुनील तारमळे, पोलीस हवालदार अहिरे, राऊत, घुले, मोरे आदींच्या पथकाने त्या ठिकाणी जावून वाटप केले आहे. तसेच आपल्या आरोग्याची काळजी व योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आहेत.

Check Also

खारघरमध्ये नाट्यगृह उभारणीकरिता भूखंड द्या

आमदार प्रशांत ठाकूर यांची सिडकोकडे आग्रही मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त एज्युकेशनल हब असलेल्या खारघरमध्ये …

Leave a Reply