Breaking News

सुकापूर भगतवाडी (पनवेल) : जय अंबे माता मंडळाच्या वतीने प्रथमच आगरी कोळी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सोमवारी भेट देऊन आयोजकांचे कौतुक केले. भाजप जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव आदी सोबत होते. या वेळी मंडळाचे अध्यक्ष भगवानशेठ भगत, भाजप नेते अशोक पाटील आदींनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा सन्मान केला. या महोत्सवाच्या माध्यमातून संस्कृती जपण्याचा स्तुत्य प्रयत्न केला जात असून, त्यास नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

Check Also

वायू-जलप्रदूषण रोखण्यासाठी राज्यस्तरीय समिती; आमदार प्रशांत ठाकूर यांचा समावेश

पनवेल : रामप्रहर वृत्तराज्यातील वायू व जलप्रदूषणाला आळा घालण्यासाठी तसेच औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांकडून घेतली जाणारी …

Leave a Reply