Breaking News

अ. पां. भोईर विद्यालय व कॉलेजचा वार्षिक महोत्सव

पनवेल : रामप्रहर वृत्त

रयत शिक्षण संस्थेचे अ.पां.भोईर विद्यालय व रघुनाथशेठ जितेकर ज्यु .कॉलेज दापोली-पारगाव विद्यालयात 2019-20 या शैक्षणिक वर्षातील वार्षिक महोत्सव नुकताच झाला.

या महोत्सवाची सुरुवात विज्ञान प्रदर्शन व वनस्पती प्रदर्शनाने  झाली. प्रदर्शनात इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी आपला सहभाग दर्शविला. जवळजवळ 120 बालवैज्ञानिकांनी मिळून आपले 91 विज्ञान प्रयोगसादर केले तर प्रत्येक वर्गातून दोन अशा एकूण 44 वनस्पती व त्यांचे औषधी महत्व सांगणारे वनस्पती प्रदर्शन सर्वांचे आकर्षण ठरले.

या प्रदर्शनाचे उद्घाटन स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य राम हरी म्हात्रे व प्रकाश जितेकर यांच्या हस्ते झाले. त्यांच्या समवेत विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.टी.चाळके, उपमुख्याध्यापक हिंगसे, पर्यवेक्षक ए. टी. मांडवकर तसेच सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.

क्रीडा स्पर्धांमध्ये इयत्ता पाचवी ते नववीच्या सर्व विद्यार्थ्यांनी विविध सांघिक व वैयक्तिक अशा मैदानी व मनोरंजनात्मक खेळात सहभाग घेतला. महोत्सवाची सांगता विविध कलागुणदर्शनीय सांस्कृतिक कार्यक्रमाने झाली. नृत्य,गायन या कलात निपुण असलेल्या विद्यार्थ्यांनी आपली कला ह्यावेळी सादर केली. या वेळी प्रकाश जितेकर, ओवळे केंद्राचे केंद्रप्रमुख पी. पी. कोळी, मच्छिंद कटेकर,  गंगाधर पाटील, महेश जितेकर, संतोष दमडे, गीता जितेकर तसेच पालक वर्ग व ग्रामस्थ उपस्थित होते.

Check Also

कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा

विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …

Leave a Reply