प्रिआ स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धा

मोहोपाडा : प्रतिनिधी
येथील प्रिआ स्कूलच्या मैदानावर सात दिवसीय वार्षिक क्रीडा स्पर्धा मोठ्या उत्साहात झाली. विद्यार्थ्यांच्या क्रीडा कौशल्याला व सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेत वैयक्तिक खेळांमध्ये 100 मीटर धावणे, बकेट बॉल, बास्केट बॉल, तीन पायांची शर्यत, बुक बॅलन्सिंग, बिस्कीट रेस, सॅक रेस, दोरी उड्या, फुगे फुगवणे, बनाना रेस, रेडी फॉर द स्कूल यांसह रस्सीखेच, हॉलीबॉल, पासिंग बॉल, थ्रो बॉल असे सांघिक खेळ घेण्यात आले. यामध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन आपले कौशल्य दाखविले.
क्रीडा स्पर्धेस शाळेच्या मुख्याध्यापिका मधू शैलेंद्र, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Check Also

The member group is always indeed there to aid when needed

Partypoker are an extremely valued spouse for people. And greatest of all – the value …

Leave a Reply