उरण : वार्ताहर
शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रातही विद्यार्थ्यांनी नैपुण्य प्राप्त करावे यासाठी उरण तालुक्यातील आवरे येथील रामचंद्र म्हात्रे विद्यालय येथे वार्षिक क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये विविध खेळांचा समावेश आहे.
या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन वनाधिकारी महादेव गावंड यांच्या हस्ते झाले. या वेळी विद्यालयाचे प्राचार्य श्री. गायकवाड, शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. क्रीडा महोत्सवात प्रामुख्याने खो-खो, कबड्डी, बुद्धिबळ, कॅरम, धावणे आदी स्पर्धांचा समावेश असून, स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला आहे. स्पर्धेतील सर्व विजेत्यांना प्रजासत्ताक दिनी (26 जानेवारी) पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे.
Check Also
वडापाव दिवस २३ ऑगस्ट; सिनेमाच्या जगातही भारी टेस्टी!
वडापाव असं म्हणताक्षणीच तुम्हा प्रत्येकाच्या जीभेवर म्हणा, डोळ्यासमोर म्हणा, आठवणीत म्हणा त्याची चव आलीच असणार. …
RamPrahar – The Panvel Daily Paper