पनवेल : वार्ताहर
65वी राष्ट्रीय शालेय किक बॉक्सिंग स्पर्धा नुकतीच पंजाबमधील संगरूर येथे झाली. त्यात महाराष्ट्र राज्य संघाचे प्रतिनिधित्व करताना रायगड जिल्ह्यातील खेळाडू प्रद्युम्न अशोक म्हात्रे याने 80 किलोवरील गटात सुवर्णपदक जिंकले.
प्रद्युम्नला प्रशांत गंगार्डे यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल ‘वाको’ महाराष्ट्रचे अध्यक्ष संतोष म्हात्रे, उपाध्यक्ष मंदार पनवेलकर व सचिव प्रवीण काळे यांनी प्रद्युम्नचे अभिनंदन केले.
Check Also
तब्बल 33 वर्षांपासून फरार असलेला खुनी पती गजाआड
पनवेल : वार्ताहर पत्नीला जिवंत जाळून फरार झालेला आरोपीचा तब्बल 33 वर्षांनंतर छडा लागला आहे. …