रेवदंडा : प्रतिनिधी
रेझींग डे निमित्त रेवदंडा पोलिसांनी गुरूवारी (दि. 2) बाजारपेठेतून रॅली काढली होती. कोएसोच्या स. रा. तेंडुलकर विद्यालयाचे विद्यार्थी व पोलीस बँड पथकही या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. रेवदंड्यांचे पोलीस निरीक्षक सुनिल जैतापुरकर यांनी सुरुवातीला विद्यार्थ्याना रेझींग डेचे महत्व सांगितले. या वेळी विद्यार्थीनींनी जैसे करते हो खुदकी रक्षा, ऐसेही करो बेटी सुरक्षा, असे फलक हाती घेऊन बेटी बचाव, बेटी पढाव अभियानातून जनजागृती केली. त्यानंतर पोलिसांनी विद्यार्थी व बँड पथकासह रेवदंडा बाजारपेठेत रॅली काढली. ही रॅली पहाण्यास ग्रामस्थांनी रस्त्याच्या दुर्तफा गर्दी केली होती.