Breaking News

जसप्रीत बुमराहला पॉली उम्रीगर पुरस्कार

मुंबई : प्रतिनिधी
आपल्या भेदक गोलंदाजीने जगभरातील फलंदाजांची दाणादाण उडवणारा भारताचा आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्या शिरपेचात अजून एका मानाचा तुरा खोवला गेला आहे. गेल्या वर्षभरात बुमराहने केलेल्या धडाकेबाज कामगिरीसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) त्याला 2018-19 या वर्षातील सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूला देण्यात येणारा पॉली उम्रीगर पुरस्कार जाहीर केला आहे.
 जसप्रीत बुमराहने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीची सुरुवात 2016मध्ये केली होती. तेव्हापासून आतापर्यंत त्याने 58 एकदिवसीय सामन्यांत 103 बळी टिपले आहेत, तर 44 टी-20 सामन्यांत 53 फलंदाजांची शिकार केली आहे, तसेच बुमराहने 2018 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर आतापर्यंत 12 कसोटी सामन्यांत 62 गडी बद केले आहेत. या काळात त्याने अनेक सामन्यांमध्ये भारतीय संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला आहे.  

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply