मुंबई ः मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आंबोली येथे दोन कार आणि एका बाइकचा भीषण अपघात झाला. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला असून, यामध्ये एका महिलेचा समावेश आहे. अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुंबईकडून गुजरातकडे जाणार्या भरधाव कारसमोर बाइकस्वार आल्याने हा भीषण अपघात घडला. अपघातात तिन्ही वाहनांचा चक्काचूर झाला. आकाश चव्हाण (42-बोरिवली), नवनाथ नवले (25- मोखाडा), भागवत जाधव (50 -पनवेल), प्रतिमा शहा (70 -कांदिवली), राकेश शहा (50 -कांदिवली) आणि दिलीप चंदानी (30 -पनवेल) हे सहा जण मृत, तर दोन जण जखमी झाले आहेत.
Check Also
दिवाळी अंकांतून साहित्य क्षेत्राला नवी उंची -मंत्री आशिष शेलार
रौप्य महोत्सवी स्पर्धेचे पारितोषिक वितरण पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले …
RamPrahar – The Panvel Daily Paper