Breaking News

चेतेश्वर पुजाराचे विक्रमी द्विशतक

राजकोट : वृत्तसंस्था
भारतीय कसोटी संघात माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडनंतर जागा निर्माण करणार्‍या चेतेश्वर पुजाराने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये आणखी एक द्विशतक झळकावले आहे. राजकोट येथे माधवराव सिंधिया क्रिकेट मैदानावर सौराष्ट्रविरुद्ध कर्नाटक सामन्यात पुजाराने विक्रमी द्विशतकी खेळी केली.
रणजी ट्रॉफीत सौराष्ट्रविरुद्धच्या एलिट ग्रुप ए आणि ग्रुप बीमधील सामन्यात कर्नाटककडून खेळताना पुजाराने 314 चेंडूत 13वे द्विशतक पूर्ण केले. भारताकडून प्रथम श्रेणी सामन्यात आतापर्यंत कोणत्याही फलंदाजांना इतकी द्विशतके केली नाहीत.
भारताकडून प्रथम श्रेणी सामन्यात सर्वाधिक द्विशतक करण्याचा विक्रम पुजाराच्या नावावर आहे. द्विशतकाच्या यादीत पुजारानंतर विजय मर्चंट यांचा क्रमांक लागतो. मर्चंट यांनी 11 द्विशतके केली आहेत. त्यानंतर प्रत्येकी 10 द्विशतकासह विजय हजारे आणि सुनील गावस्कर तिसर्‍या स्थानावर आहेत, पण या तिन्ही क्रिकेटपटूंनी निवृत्ती घेतलेली आहे.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply