पेण : पेण नगरपरिषद फणसडोंगरी शाळा क्रमांक 8मधील शिक्षिका रंजना राजेंद्र म्हात्रे यांना अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक तालुका संघ पेण यांच्या वतीने गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पेणमधील आगरी समाज हॉल येथे झालेल्या कार्यक्रमात त्यांना जि. प. सदस्या नीलिमा पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
रंजना म्हात्रे यांचा यापूर्वी संस्कृती संवर्धन संस्थेकडून आदर्श शिक्षक म्हणून गौरव करण्यात आला असून पेण गांधी मंदिर वाचनालयाच्या वतीने देण्यात येणार्या साहित्याची पैठणी हा मान दोन वेळा मिळाला आहे.