Breaking News

पाईपलाईन बदलण्याच्या कामाचा शुभारंभ

नगरसेवक समीर ठाकूर यांच्या पाठपुराव्यास यश

पनवेल : बातमीदार

नवीन पनवेल परिसरातील नागरिकांना पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. भाजपचे नगरसेवक समीर ठाकूर यांनी या पाणी प्रश्नासाठी सिडकोकडे तीन वर्षे पाठपुरावा केला. या प्रयत्नांना यश आले असून, त्यांच्या पाठपुराव्याने पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. त्यानुसार प्रभाग क्रमांक 16मध्ये पाईपलाईन बदलण्याच्या कामाचा शुभारंभ महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला.

नवीन पनवेल सेक्टर 10 येथील संपूर्ण अंतर्गत पाईपलाईन ही 80 मिमी व्यासाची होती. ती बदलून आता 100 मिमीची टाकण्यात येणार आहे. याचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. विशेषत: स्थानिक नगरसेवक समीर ठाकूर यांच्या पाठपुराव्याने सेक्टर 10मधील राहिवाशांचा गंभीर पाणीप्रश्न सोडविण्यास मदत होणार आहे. ठाकूर यांनी सतत तीन वर्षे पाण्याबाबत सिडको स्तरावर पत्रव्यवहार करून काम पूर्ण केले आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्न लवकरच सुटणार आहे.

सिडकोकडे पाठपुरावा करून पाईपलाईन बदलण्याला सुरुवात झाल्याने लवकरच पाण्याचा प्रश्न सुटणार असून, नागरिक समीर ठाकूर यांचे आभार

मानत आहेत.

महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या हस्ते व स्थानिक नगरसेवक समीर ठाकूर तसेच नगरसेविका राजश्री वावेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या कामाचा शुभारंभ करण्यात आला.

Check Also

युवा नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत हेल्मेट वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्तभाजपचे युवा नेते, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते व विद्यमान नगरसेवक परेश …

Leave a Reply