Breaking News

म्हसळा तालुक्यात केवळ 28 पोलीस पाटील कार्यरत, 41 गावांचा कार्यभार अतिरिक्त, 12 गावे वार्यावर

म्हसळा : प्रतिनिधी

म्हसळा तालुक्यात 81 महसुली गावे आहेत. त्यातील 66 गावे म्हसळा पोलीस ठाणे, सात गावे दिघी सागरी पोलीस ठाणे आणि आठ गावे गोरेगाव पोलीस ठाण्या अंतर्गत येतात. गाव तेथे पोलीस पाटील असे शासनाचे धोरण आहे. मात्र तालुक्यात सध्या केवळ 28 पोलीस पाटील कार्यरत आहेत. मयत, रिटायर्ड या कारणाने 12 गावी पोलीस पाटलांच्या नेमणूका अगर कार्यभार दिला नसल्याने ती गावे वार्‍यावर असल्याची माहिती पुढे येत आहे. 

मुंबई नागरी कायदा 1857 नुसार ग्रामीण भागात पोलीस पाटील हे पद निर्माण करण्यात आले. गावामध्ये पोलीस पाटलाकडे कायद्याचा प्रथम पालक म्हणून पाहिले जाते. कायदा व शासनाचे काम करताना पोलीस पाटलांना अनेक अडचणी येतात. घडलेल्या गुन्ह्याचा तपास लावताना पोलिसांना योग्य ती माहिती व गुन्हेगारी कृत्य करणार्‍यांच्या अटकेपर्यंतची मदत पोलीस पाटील करीत असतो.

गावामध्ये सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी, तसेच चोरी, चोरीचा माल, कैदी, संशयित मृत्यू, विविध प्रकारच्या गुन्ह्यांसंदर्भात पोलिसांना वेळोवळी माहिती देणे व प्रामुख्याने तलाठी, ग्रामसेवक आणि पोलीस अधिकार्‍यांना विविध तपासात नियमित सहकार्य करण्याचे काम, तसेच साथीचे रोग, नैसर्गिक आपत्ती या सारख्या महत्वाच्या प्रसंगी पोलीस पाटील चांगली भूमिका बजावत असतात.

-अशी आहेत रिक्त पदे

कुडतोडी, ढोरजे, मोरवणे, देहेन, वांगणी, भापट, ताम्हने करंबे, कोलवट, चिरगाव, भेकर्‍याचा कोंड, रातीवणे, रोहिणी

-येथे अतिरिक्त कार्यभार 

(महसुली गाव व अंक स्वरूपात

अतिरिक्त कार्यभार)

नेवरूळ 5, पांगळोली 4, रेवली, तळवडे, आणि संदेरी प्रत्येकी तीन, खरसई, केलटे, खामगाव, आगरवाडा, पाभरे, खारगांव (बु), गोंडघर प्रत्येकी दोन, आणि निगडी, देवधर कोंड, सुरई, सोनघर, चिखलप, काळसुरी, गोडधर प्रत्येकी एक.

नागरिक आणि प्रशासन यांच्यातील दुवा म्हणून पोलिस पाटील काम करतात. म्हसळा तालुक्यांतील अनेक गावात मोठ्या प्रमाणात विकास होत असल्याने अतिरीक्त कार्यभार झेपणे दिवसेंदिवस कठीण होत आहे. शासनाने रिक्त पदांची भरती प्रक्रिया तातडीने पूर्ण करणे आवश्यक आहे.

-अनंत पाटील, अध्यक्ष,

म्हसळा तालुका पोलीस पाटील संघटना

पोलीस पाटलांची उपविभागनिहाय बिंदू नामावली अद्ययावत करून त्यांची भरती संबंधित उपविभागीय कार्यालयामार्फत केली जाते. म्हसळा,श्रीवर्धनमधील रिक्त पदांची माहिती जिल्हाधिकार्‍यांना सादर

करण्यात येईल.-अमित शेडगे, उपविभागीय अधिकारी

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांना महाराष्ट्र प्रदेश भाजप चिटणीसपदाची मोठी जबाबदारी

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची घोषणा …

Leave a Reply