खालापूर : प्रतिनिधी
खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या बी. एल. पाटील तंत्रनिकेतन कॉलेज येथे आयईडीएसएसए अंतर्गत मुंबई व कोकण विभागीय कुस्ती व वेटलिफ्टिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. वेगवेगळ्या वजनी गटातील
स्पर्धेत मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध तंत्रनिकेतनमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष संतोष जंगम यांच्या हस्ते झाले. समारंभास प्रमुख पाहुणे उपाध्यक्ष संजय पाटील, बी. एल. पाटील, गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष जितेश ठक्कर, प्राचार्य प्रशांत माने, स्पर्धा संयोजक प्रा. स्वागत ठाकूर, प्रा. शिवाजी मुरादे, इतर विभागप्रमुख, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
विजेत्यांना सदस्य, देवन्हावे श्री. छत्रपती विद्यालय शालेय समिती अध्यक्ष भास्कर लांडगे, जनता प्राथमिक विद्यालय अध्यक्ष चंद्रकांत केदारी, प्राचार्य माने यांंच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.
Check Also
अमिताभ बच्चन ‘न दिसलेला, न पाहिलेला’
आज ११ ऑक्टोबर २०२६ शहेनशहा अमिताभ बच्चनचा ८४वा वाढदिवस आणि या वयातही कार्यरत. या अष्टपैलू …
RamPrahar – The Panvel Daily Paper