Breaking News

पोपटाची स्क्रिप्ट हल्ली बारामतीतून येते

मुख्यमंत्र्यांकडून राज ठाकरेंची खिल्ली

मुंबई : प्रतिनिधी

पोपटाच्या भाषणाची स्क्रिप्ट हल्ली बारामतीतून येते. ते भाषणाची सुपारी घेतात. त्यामुळे त्यांच्या भाषणाने विचलित होऊ नका, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना लगावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सूर्यासारखे असून, त्यांच्याकडे पाहून थुंकल्यास ते आपल्यावरच पडते, अशी टीकाही मुख्यमंत्र्यांनी केली.

मुख्यमंत्री फडणवीस रविवारी (दि. 10) मुंबई येथे भाजपच्या महिला मेळाव्यात बोलत होते. राज ठाकरे यांनी शनिवारी मनसेच्या 13व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला होता. त्यांच्या या टीकेला फडणवीस यांनी चोख प्रत्युत्तर दिले.

राज ठाकरे हे फक्त कलाकार आहेत. ते बारावा खेळाडूही नाहीत आणि नॉन प्लेयिंग कॅप्टनही नाहीत. त्यांना एक खासदार, आमदार, नगरसेवकदेखील निवडून आणता येत नाही. त्यामुळे त्यांनी जी सुपारी घेतलीय, त्या सुपारीनुरूप ते भाषणे करीत राहतील, पण त्यांच्या भाषणाने कुणीही विचलित होणार नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले.

लोकसभा निवडणुकीसाठी भाजप सज्ज

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात भारत सुरक्षित आहे. भारतावरील हल्ल्यानंतर त्यांनी सडेतोड उत्तर दिले. भारत बदलतोय, महाराष्ट्र बदलतोय, असे सांगत लोकसभा निवडणुकीसाठी भाजप सज्ज असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले. 50 वर्षांत जे घडले नाही ते मागील पाच वर्षांत घडले. या वेळी महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युती 45 जागा घेतल्याशिवाय राहणार नाही, असा दावाही त्यांनी केला.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply