Breaking News

लोकसभा महासंग्रामाचा बिगुल वाजला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

बहुप्रतीक्षित लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे. देशभरात एकूण सात टप्प्यांमध्ये राजकीय महासंग्राम रंगणार असून, त्याचा एकत्रित निकाल 23 मे रोजी लागणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी रविवारी (दि. 10) पत्रकार परिषदेत ही महत्त्वपूर्ण घोषणा केली. लोकसभेसह आंध्र प्रदेश आणि सिक्कीम विधानसभेसाठी, तसेच 12 राज्यांच्या 34 विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठीही लोकसभेबरोबर मतदान होईल. दरम्यान, निवडणूक जाहीर होताच संपूर्ण देशात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.

सर्व मतदान केंद्रांवर ‘व्हीव्हीपॅट’

यंदा सर्व मतदान केंद्रांवर व्हीव्हीपॅट यंत्रे असतील. त्यामुळे मतदारांनी नोंदवलेले मत त्यांनी दिलेल्या उमेदवारालाच गेले आहे याची खात्री करता येणार आहे. त्याचबरोबर ईव्हीएम मशीनलाही अनेकस्तरीय सुरक्षा असेल.

देशभरात एकूण 10 लाख केंद्रांवर मतदान होईल. सर्व मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे असतील. संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचे चित्रीकरण केले जाणार आहे.

रायगडात 23; तर मावळमध्ये 29 एप्रिलला मतदानलोकसभा निवडणुकांमध्ये रायगड मतदारसंघासाठी तिसर्‍या टप्प्यात म्हणजेच 23 एप्रिलला मतदान होणार आहे, तर मावळ मतदारसंघात चौथ्या टप्प्यात म्हणजेच 29 एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया होईल.

यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून, त्यामध्ये मतदानाच्या तारखेपर्यंत वाढ होऊ शकते. त्यासाठी आयोगाकडून मतदार नोंदणी प्रकिया सुरू आहे.
-सुनील अरोरा, मुख्य निवडणूक आयुक्त

Check Also

मोहोपाड्यात रविवारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण संवाद मेळावा

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष उरण विधानसभेच्या वतीने रविवारी (दि. 14) सकाळी 10.30 …

Leave a Reply