Breaking News

रसायनीत विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी

मोहोपाडा : प्रतिनिधी : रसायनी डॉक्टर असोसिएशनच्या (प्रायमा) वतीने रिस येथील राजिप शाळेत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

शिबिरात शाळेतील 76 विद्यार्थ्यांच्या आरोग्याची तपासणी करून त्यांना मोफत औषधोपचार देण्यात आले. तसेच तज्ञ दंतचिकीत्सक, त्वचा स्पेशालिस्ट, नेत्ररोग, मेडीस्ट्रेशन, जनरल फिजिशन, बालरोगतज्ज्ञ आदी डॉक्टरांनी विद्यार्थ्यांची तपासणी करून त्यांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले.

या वेळी डॉ. मनोज कुचेरिया, डॉ. विशालाक्षी शेडबाले, डॉ. रश्मी बागडे, डॉ. धिरज जैन, डॉ. सागर कांबले, डॉ. प्रणिता वानखेडे, डॉ. सुरभी जैन, डॉ. प्रणिता कांबळे, डॉ. विशाल राऊत, डॉ. कुणाल कांबळे आदी प्रायमा डॉक्टर असोसिएशनचे डॉक्टर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या युगात विविध क्षेत्रांचा अनुभव घ्यावा -लोकनेते रामशेठ ठाकूर

उरण : रामप्रहर वृत्तकर्मवीर अण्णांनी दिलेला शिक्षण आणि संस्कारांचा आदर्श आपल्याला पुढे घेऊन जाणे अत्यंत …

Leave a Reply