Breaking News

सेवा संकल्प अभियानांतर्गत वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिक वितरण

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित सेवा संकल्प अभियानांतर्गत ‌‘विकसित भारत २०४७ सशक्त विद्यार्थी,
समृद्ध भारत‌’ या संकल्पनेवर आधारित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ गुरुवारी सीकेटी विद्यालयात पार पडला. या सोहळ्यास भाजपचे प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
‌‘विकसित भारत‌’ या मुख्य विषयावर केंद्र व तालुका स्तरावर पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत अंतर्गत केंद्र स्तरावर पार पडलेल्या स्पर्धेत ४५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. त्यातून प्रत्येक गटात प्रथम क्रमांक पटकावलेल्या एकूण ६३ गुणवंत विद्यार्थ्यांची तालुका स्तरासाठी निवड झाली.
यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी विद्यार्थ्यांच्या वक्तृत्वकौशल्याचे व वैचारिक स्पष्टतेचे मनापासून कौतुक केले. राष्ट्र उभारणीत विद्यार्थ्यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगत त्यांनी विजेत्यांचा सत्कार केला व त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय तसेच उत्तेजनार्थ क्रमांक मिळवणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गुणगौरव करण्यात आला.
या कार्यक्रमास पंचायत समिती सभापती रंजना वास्कर, उपसभापती भूपेंद्र पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्राची जाधव, माजी सदस्य अमित जाधव, पंचायत समिती सदस्य वैशाली सावंत, निलम भिंगारकर, युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष आनंद ढवळे, गट शिक्षण अधिकारी शाहू सकपाळ, विस्तार अधिकारी एस.आर. मोहिते यांच्यासह विविध केंद्रांचे प्रमुख, शिक्षक,
विद्यार्थी आदी उपस्थित होते.

Check Also

सर्वात मोठ्या दिवाळी अंक स्पर्धेचे मंगळवारी पनवेलमध्ये पारितोषिक वितरण

पनवेल : रामप्रहर वृत्तसामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावणारे श्री. …

Leave a Reply