Breaking News

पनवेल महापालिकेचा वर्धापन दिन उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महानगरपालिकेचा दहावा वर्धापन दिन गुरुवारी (दि. १) उत्साहात साजरा झाला. यानिमित्ताने पालिकेच्या चारही प्रभाग समित्यांमध्ये (खारघर, कामोठे, कळंबोली आणि पनवेल) विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
प्रभाग समिती ‘ड’ (पनवेल) येथे माजी सभागृहनेते तथा नगरसेवक परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. महिला व बालकल्याण सभापती ममता म्हात्रे, प्रभाग समिती सभापती अजय बहिरा, महापालिका सदस्य व अधिकारी उपस्थित होते. यावेळी सहाय्यक आयुक्त तथा प्रभाग अधिकारी डॉ. रूपाली माने यांनी पालिकेच्या प्रगतीचा आलेख आणि दैनंदिन कामकाजाचा आढावा मांडला.
प्रभाग समिती ‘क’ (कामोठे) कार्यालयात सभापती रवींद्र जोशी आणि सदस्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला. यावेळी सभापतींनी प्रभागात सुरू असलेल्या विकासकामांची माहिती देऊन नागरिकांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
प्रभाग समिती ‘ब’ (कळंबोली) येथे सभापती मधु पाटील आणि पालिका सदस्यांच्या प्रमुख उपस्थितीत सोहळा पार पडला. प्रभाग कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते. यावेळी प्रभागातील विविध विकासकामांचा आढावा घेऊन उपस्थितांनी नागरिकांना शुभेच्छा दिल्या.
प्रभाग समिती ‘अ’ (खारघर) कार्यालयात सभापती रवींद्र भगत यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित महापालिका सदस्यांनी प्रभागातील प्रगतिपथावरील कामांची माहिती देत नागरिकांना शुभेच्छा दिल्या तसेच कार्यक्रमास उपस्थित कर्मचारी आणि अभ्यागतांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.

Check Also

सर्वात मोठ्या दिवाळी अंक स्पर्धेचे मंगळवारी पनवेलमध्ये पारितोषिक वितरण

पनवेल : रामप्रहर वृत्तसामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावणारे श्री. …

Leave a Reply