Breaking News

एक लाख 40 हजार रुपयांची फसवणूक

पनवेल  : क्रेडीट कार्डचे कॅश बँक पॉइंट रीडीम करून देतो असे खोटे सांगुन 1 लाख 40 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार खारघर येथे घडला असून अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अझर याकुब शेख हे फातीमा मंजील, सील्वा पाखाडी लेन, वर्सोवा अंधेरी येथे राहत असून ऐ के फॅब्रीकेटर या कंपनीत साईट सुपरवायझर म्हणुन खारघर सेक्टर 18 सिकडो रिसर्च सेंटर येथे नोकरी करीत आहेत. त्यांना त्यांच्या मोबाइलवर फोन आला व महिलेने समोरून स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेचे क्रेडीट कार्ड डिपार्टमेन्ट मधुन बोलत असल्याचे त्यांना सांगितले. व त्यांच्या क्रेडीट कार्डचे कॅश बँक पॉइंट रीडीम करून देते असे सांगून क्रेडीट कार्डचा नंबर, कार्डची एक्सपायरी डेट, आणि क्रेडीट लिमीट ही सर्व माहीती त्यांनी शेख याना सांगितली. यावेळी मोबाइलवर आलेला ओटीपी पासवर्ड शेअर करण्यास शेख याना सांगितले. शेख यानी तो क्रमांक सांगताच एस. बी. आय बँकेमधून 1 लाख 39 हजार 498 रुपये गेल्याचा संदेश त्यांना मोबाइलवर आला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply