पनवेल : पनवेल तालुक्यातील विचुंबे येथील पुष्पनारायण सोसायटीमध्ये काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. हे काम जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव यांच्या शेष फंडाच्या निधीमधून करण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 14) करण्यात आले. या वेळी पनवेल पंचायत समिती सदस्य भूपेेंद्र पाटील, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद भिंगारकर, किशोर सुरते, राजेश पाटील, वामनशेठ वाघमारे यांसह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते.
Check Also
भजनी मंडळांना मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते साहित्याचे वितरण
पनवेल : रामप्रहर वृत्तभजन परंपरेचे जतन, संवर्धन व्हावे आणि हा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहचावा या …
RamPrahar – The Panvel Daily Paper