Breaking News

मराठी भाषा दिन : नेरळ रेल्वेस्थानकात रांगोळीतून शुभेच्छा; गाण्यांचीही मेजवानी

कर्जत : बातमीदार

मराठी भाषा दिनानिमित्त नेरळ रेल्वे स्थानकात गुरुवारी (दि. 27) मराठी भाषेबद्दल माहिती देणार्‍या रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. राजमुद्रा आणि मराठी आमुची मायबोली असा मजकूर असलेल्या या रांगोळ्यांच्या माध्यमातून सर्व प्रवाशांना शुभेच्छा देण्याचा प्रयत्न मनसे रेल्वे कामगार युनिटच्या माध्यमातून करण्यात आला होता. तसेच या रेल्वे स्थानकात दिवसभर मराठी भाषेतील जुनी अजरामर गाणी ध्वनिक्षेपकावर वाजवली जात होती. त्यामुळे नेरळ स्थानकातून प्रवास करणार्‍या सर्वांना मराठी भाषा दिनाचा फील जाणवत होता.

Check Also

लोकनेते दि. बा. पाटील यांना रक्तदानातून आदरांजली

पनवेलमध्ये शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल उरण आगरी समाज मंडळाच्या वतीने शेतकरी, कामगार …

Leave a Reply