Breaking News

नगरसेवक रवींद्र इथापे यांच्या कार्यअहवालाचा प्रकाशन समारंभ

नवी मुंबई : बातमीदार : सभागृह नेते तथा भाजपचे नगरसेवक रवींद्र इथापे व माजी नगरसेविका सुरेखा इथापे यांच्या वतीने शनिवारी (दि. 29) कार्यअहवाल प्रकाशन सोहळ्याचे व हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन नेरुळ येथे करण्यात आले होते.

या कार्यक्रमास हजारो महिला उपस्थित होत्या. या वेळी ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे व कार्यअहवालाचे कौतुक आमदार गणेश नाईक यांनी केले. नवी मुंबईतील सर्वांत स्वच्छ प्रभाग म्हणून या विभागाचा प्रथम क्रमांक आले आल्याचे नमूद करत इथापे यांच्या कामाचे कौतुक केले.या कार्यक्रमास आमदार  गणेश नाईक, आमदार मंदा म्हात्रे, माजी खा. संजीव नाईक, महापौर जयवंत सुतार, जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, नगरसेविका व सभापती नेत्रा शिर्के, क्रीडा सभापती डॉ. जयाजी नाथ, नगरसेवक सुनील पाटील, माजी नगरसेवक सुरेश शेट्टी, प्रभाग अध्यक्षा श्रद्धा गवस, नगरसेविका शिल्पा कांबळी उपस्थित होते.

Check Also

‌‘एसआयआर‌’च्या उरण विधानसभा प्रमुखपदी डॉ. अविनाश गाताडे

पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्रात सुरू होणाऱ्या मतदार पुनर्निरीक्षण (SIR) अभियानासाठी भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र प्रदेशतर्फे …

Leave a Reply