Breaking News

होळी करा लहान, पोळी करा दान!

‘अंनिस’ रायगड शाखेचे आवाहन

पाली ः प्रतिनिधी

होळी सण रंगांचा, सण नात्यांचा, दुष्ट आणि वाईट प्रवृत्तीचे निर्दालन करणारा म्हणून होळीचा सण साजरा केला जातो. हा सण रंगांचा आणि सर्वांचा आनंद द्विगुणित करणारा असतो. त्यामुळे तो पर्यावरणपूरक साजरा करावा, तसेच होळी लहान करा, पोळी दान करा, असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती रायगडमार्फत करण्यात आले आहे. दरवर्षी रायगड जिल्ह्यात महा. अंनिसच्या या अभियानास मोठा पाठिंबा मिळतो. मागील वर्षी सुधागड तालुक्यात पाली, अलिबाग, पेण, खोपोली, नागोठणे अशा अंनिसच्या वेगवेगळ्या शाखांच्या वतीने होळी लहान करा, पोळी दान करा, या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाला होता. अनेक हितचिंतक व सामाजिक संघटनांनीदेखील या उपक्रमात सहभाग घेतला होता. या वेळी हजारो पोळ्या जमा झाल्या होत्या. या सर्व पोळ्या अंनिसच्या कार्यकर्त्यांनी आदिवासी वाड्यांवर नेऊन वाटून गोरगरिबांची होळी गोड केली. अनेक ठिकाणी होळी पेटविण्याऐवजी गावात एकाच ठिकाणी प्रतीकात्मक होळी पेटवा. होळीनिमित्त बोंबा मारणे, अपशब्द उच्चारणे यापासून कटाक्षाने लांब राहा. होळीत पोळी जाळण्याऐवजी ती पोळी गरजूंना द्या. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी कोरड्या रंगांनी होळी-रंगपंचमी खेळा. होळीत प्लास्टिक, टायरसारख्या हानिकारक वस्तू जाळू नका.रंगपंचमीसाठी पर्यावरणस्नेही रंग किंवा नैसर्गिक रंगांचा वापर करा. रंगांचा सण साजरा करतानाच पर्यावरणाचीही काळजी घ्यावी. कृत्रिम रंगांऐवजी नैसर्गिक रंगांचा आग्रह धरा. पाणी वाया न घालवता कोरड्या रंगांनी आपला आनंद अधिक वाढवा, असे आवाहन अंनिसच्या वतीने करण्यात आले आहे.

Check Also

सर्वांनी शिवरायांचे विचार जगायला हवेत -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती …

Leave a Reply