Breaking News

ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित यांचे निधन

पुणे : प्रतिनिधी

ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक अनंत भगवान दीक्षित (वय 67) यांचे दीर्घ आजाराने सोमवारी (दि. 9) सायंकाळी खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या मागे त्यांची पत्नी आणि कन्या असा परिवार आहे. गेल्या चार दशकांहून अधिक काळ पत्रकारितेत असलेल्या दीक्षित यांनी ‘सकाळ’च्या कोल्हापूर आवृत्तीचे आणि त्यानंतर पुणे आवृत्तीचे संपादक म्हणून काम पाहिले. ‘लोकमत’च्या पुणे आवृत्तीचे ते काही काळ संपादक होते. निवृत्तीनंतर विविध वृत्तवाहिन्यांवर राजकीय विश्लेषक या नात्याने ते परखड भूमिका मांडत असत. दीक्षित यांच्या ललित लेखनाची पुस्तके प्रकाशित झाली असून त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.

Check Also

रिटघर येथे लोकनेते रामशेठ ठाकूर अमृत महोत्सवी वर्ष शुभचिंतन समारंभ उत्साहात

विद्यालयासाठी ४० लाखांची घोषणा पनवेल : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, थोर देणगीदार, …

Leave a Reply