
कामोठे : लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त महिला पालकांसाठी कार्यकमाचे आयोजन मुख्याध्यापिका स्वप्नाली संजय म्हात्रे यांनी केले होते. या वेळी पनवेल महानगरपालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, महिला व बालकल्याण सभापती कुसुम म्हात्रे, नगरसेविका पुष्पा कुत्तरवडे, संतोषी तुपे, तसेच स्त्री रोग तज्ञ गणेश वाकचौरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.