Breaking News

पोलादपूरमध्ये वृद्ध बैलाचे उत्तरकार्य

मुंबई : प्रतिनिधी

लोकसभा निवडणूक मतदानासाठी मतदारांना सुविधा, तसेच एकूणच प्रक्रिया निर्भय, मुक्त, पारदर्शी होण्यासाठी निवडणूक आयोग डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करणार आहे. आचारसंहितेचे काटेकोर पालन व्हावे यासाठी सी व्हिजिल हे नवे मोबाइल अ‍ॅप उपलब्ध करण्यात आले असून, आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास या अ‍ॅपच्या माध्यमातून ऑनलाईन तक्रार करता येणार आहे.

सी व्हीजिल अ‍ॅपचा वापर निवडणूक अधिसूचनेच्या तारखेपासून मतदानाच्या दुसर्‍या दिवसापर्यंत केला जाऊ शकतो. तक्रारीचे छायाचित्र अथवा व्हिडीओ पुरावा म्हणून थेट अपलोड करण्याची सुविधा आहे. कॅमेरा, इंटरनेट कनेक्शन आणि जीपीएस सुविधा असलेल्या अँड्रॉइड स्मार्टफोनद्वारे या अ‍ॅपच्या माध्यमातून तक्रार करता येईल. सिटिजन व्हिजिलन्स अंतर्गत सुरू करण्यात आलेले हे अ‍ॅप नागरिकांसाठी प्रभावी अस्त्र ठरेल, असा दावा आहे.

आचारसंहिता भंग होत असल्याचे वाटल्यास नागरिकाने त्या घटनेचे छायाचित्र अथवा दोन ते तीन मिनिटांचा व्हिडीओ रेकॉर्ड करावा. जीपीएस प्रणालीद्वारे स्वयंचलित स्थान मॅपिंगसह फोटो अथवा व्हिडीओ या अ‍ॅपवर अपलोड करावा. त्यानंतर तक्रारदार नागरिकाच्या मोबाईलवर युनिक आयडी प्राप्त होईल. अ‍ॅप वापरकर्त्यास आपली ओळख लपवून तक्रार नोंदविण्याचा पर्याय उपलब्ध आहे. यात मोबाईल नंबर आणि इतर व्यक्तिगत तपशील अ‍ॅप प्रणालीवर पाठवले जात नाहीत. त्यामुळे निनावी तक्रारीच्या बाबतीत पुढील संदेश मिळत नाहीत, मात्र त्याच्या तक्रारीवर कारवाई केली जाते.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply