
उरण : वार्ताहर
कोरोनाचा व्हायरल रोखण्यासाठी जिल्हा प्रश्सानाने उरण परिसरात लॉकडाऊन असल्याने सर्वत्र बंद पाळण्यात आला आहे. मात्र रस्त्याच्या बाजूस बेघर असलेल्या, भुकेलेल्या पोटासाठी उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश कुलकर्णी यांच्या पुढाकाराने शुक्रवारी ओएनजीसी सीआयएसएफ कॉलोनी, समोरील सावित्रीबाई झोपडपट्टी, इंगलगेट समोरील झोपडपट्टी येथे राहणारे नागरिकांना व परिसरात नाष्टा म्हणून कांदेपोहे वाटप करण्यात आले. कांदे पोहे वाटप करताना सहाय्यक पोलीस निरीक्षक वृषाली पवार, पोलीस उपनिरीक्षक अनिल चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक व्ही. एस. कोळेकर, हवालदार संतोष मोहिते, पोलीस नाईक टिके, पोलीस नाईक डाकी आदी उपस्थित होते. झोपडपट्टीमधील लोक हे रोज कामावर जातात रोज जे मिळते त्यावर ते आपले पोट भरतात, परंतु उरण परिसरात लॉकडाऊन असल्याने सर्वत्र बंद पाळण्यात आल्याने त्या लोकांना काम नाही, रोजगार नाही, त्यामुळे पैसा नाही त्यांची परिस्थिती बिकट आहे. या परिस्थित त्यांना मदतीचा हात म्हणून नाष्टा, पिण्याचे पाणी, मास्क देण्याचे काम वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सारे करीत आहोत. असे उरणच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक वृषाली पवार यांनी सांगितले.
RamPrahar – The Panvel Daily Paper