Breaking News

स्वजलधारा योजनेचे लोकार्पण

उरणमधील कासवलेपाड्यात विकासाची गंगा

उरण : प्रतिनिधी, वार्ताहर

उरण तालुक्यातील करंजा कासवलेपाड्यात लोकवर्गणी, शासनाच्या मदतीने व भाजपच्या प्रयत्नातून सुरू करण्यात आलेल्या स्वजलधारा योजनेचे लोकार्पण भाजप जिल्हा अध्यक्ष आमदार

प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी (दि. 7) झाले. या वेळी भाजप जिल्हा सरचिटणीस आमदार महेश बालदी यांचीही उपस्थिती होती.

मागील अनेक वर्षांपासून कासवलेपाड्यात महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत होती. या गावातील हजारो मायभगिनींच्या डोक्यावरील हंडा उतरविण्यासाठी स्थानिक भाजप कार्यकर्त्यांकडून प्रयत्न सुरू करण्यात आले होते. या प्रयत्नात आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांची मोलाची साथ लाभली. सिडकोच्या हेटवणे प्रकल्पातून या गावाला पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

भाजपच्या प्रयत्नातून सुरू करण्यात आलेली ही योजना शनिवारी कार्यान्वित करण्यात आली. या लोकार्पण सोहळ्यास भाजपचे उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, शहर अध्यक्ष कौशिक शहा, उरणच्या नगराध्यक्ष सायली म्हात्रे, जिल्हा परिषद सदस्य रिना घरत, विस्तारक अविनाश कोळी, करंजा मच्छीमार संस्थेचे चेअरमन भालचंद्र कोळी, माजी चेअरमन प्रदीप नाखवा, माजी उपाध्यक्ष नारायण नाखवा, रमेश नाखवा, राजेश नाखवा, चाणजे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच जितेंद्र घरत, भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. याबद्दल ग्रामस्थांनी आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांचे आभार मानले.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply