Breaking News

टपाल आयुर्विम्याच्या हप्त्यास मुदतवाढ

अलिबाग ः प्रतिनिधी

कोविड-19 साथीचा आजार आणि लॉकडाऊनमुळे निर्माण झालेले भीतीचे वातावरण लक्षात घेता दळणवळण मंत्रालय, टपाल विभाग, टपाल आयुर्विमा संचालनालयाने मार्च 2020 रोजी देय असलेल्या प्रीमियमला कोणतेही दंड शुल्क न आकारता 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

टपाल कार्यालये अत्यावश्यक सेवा म्हणून सुरू असली तरीही टपाल आयुर्विमा, ग्रामीण टपाल आयुर्विम्याच्या ग्राहकांना प्रीमियम भरण्यासाठी टपाल कार्यालयात पोहचण्यास अनेक अडचणी येत आहेत. म्हणूनच सर्व पीएलआय, आरपीएलआय ग्राहकांच्या सोयीसाठी प्रीमियम देयकाचा कालावधी वाढविला आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून पनवेलमधील कानपोलीत विकासकामे

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते शुभारंभ पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल विधानसभा मतदारसंघात आमदार प्रशांत …

Leave a Reply