Breaking News

अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त पेट्रोल देण्यास मनाई

अलिबाग : जिमाका
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अत्यावश्यक सेवा पुरविणार्‍यांव्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तींच्या दुचाकी वाहनांना नागरी भागात पेट्रोल देण्यास मनाई करण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी निधी चौधरी यांनी पारित केले आहेत. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित पेट्रोल पंपधारकाविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असेही चौधरी यांनी स्पष्ट केले आहे.
कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. तथापि या कालावधीत अत्यावश्यक सेवा, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा व स्वच्छता कर्मचारी यांच्या सेवा सुरू राहणे आवश्यक आहे.
या आदेशान्वये आता 31 मार्चपासून पुढील आदेश होईपर्यंत शासकीय,निमशासकीय, बँक, पोलीस, डॉक्टर, नर्सेस, सफाई कर्मचारी आदी अत्यावश्यक सेवा पुरविणार्‍या अधिकारी-कर्मचार्‍यांची दुचाकी वाहने, मेडिकल, पॅरामेडिकल, पॅथॉलॉजी इत्यादी वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणार्‍या व्यक्तींची दुचाकी वाहने, अत्यावश्यक सेवेसाठी काम करणार्‍या उदा. दवाखाना, गॅस सिलिंडर, बँक व्यवहार, वृत्तपत्र वाटप करणे, पत्रकार, सुरक्षा रक्षक यांची दुचाकी वाहने, कोविड-19चा प्रतिबंध करण्यासाठी काम करणार्‍या खाजगी व्यक्तींची दुचाकी वाहने, शासकीय कार्यालयामार्फत परवानगी दिलेल्या व्यक्तींची दुचाकी वाहने  या व्यतिरिक्त इतर कोणत्याही दुचाकी वाहनांना नागरी भागात पेट्रोल देण्यास मनाई करण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी पारित केले आहेत.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply