Breaking News

एसटी कर्मचार्‍यांचे पगार रखडले

मुरूड ः प्रतिनिधी

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने एसटी वाहतूक बंद केल्याने महामंडळाचे लाखो रुपयांचे नुकसान होऊन सर्व गाड्या आगारातच उभ्या आहेत. उत्पन्न घटल्यामुळे एसटी कर्मचारी वृंदाचा पगार कसा करायचा, हा प्रश्न निर्माण झाला आहे. विभागीय कार्यालयातील कर्मचार्‍यांचे पगार 1 तारखेला, तर सर्व आगारातील कर्मचार्‍यांचे पगार प्रत्येक महिन्याच्या 7 तारखेला होतात, परंतु या दोन्ही तारखा जाऊनही पगार होऊ शकले नाहीत. त्यामुळे एसटी कर्मचारी वृंदाचे हाल होत आहेत.मुरूड आगारात 219 कर्मचारी कार्यरत आहेत, परंतु त्यांनाही पगार मिळाला नाही. एसटी कर्मचारी संघटनेकडून वेतन वेळेत मिळण्यासाठी सरकारला निवेदन देण्यात आले आहे,  परंतु अद्याप पगार खात्यामध्ये जमा न झाल्याने एसटी कर्मचारी त्रस्त झाले आहेत.

Check Also

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह भव्य मूट कोर्टचे बुधवारी उद्घाटन

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सोहळा पनवेल ः रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक …

Leave a Reply