पनवेल : वार्ताहर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी असताना मॉर्निंग वॉकला गेलेल्या कळंबोलीतील 35 जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. यामध्ये 31 पुरुष आणि चार महिलांचा समावेश आहे. या सर्वांना कळंबोली पोलीस ठाण्यातील आवारात आणून दोन तास योगाचे धडे स्वतः उपनिरीक्षक बच्छाव यांनी दिले. त्यानंतर संबंधित नागरिकांवर भा. दं. वि. 188प्रमाणे कारवाई केल्यानंतर समज देऊन घरी पाठवण्यात आले.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या संचारबंदी लागू करण्यात आली असूनसुद्धा काही लोक क्षुल्लक कारणावरून बाहेर जात आहेत. त्यामुळे पोलिसांकडून याबाबत कडक पावले उचलली जात आहेत. कळंबोलीतील 35 जण शनिवारी (दि. 11) मॉर्निंग वॉकला गेल्याचे आढळून आले. या सर्वांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
Check Also
शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव
पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …