Breaking News

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाकडून वह्यांचे वाटप

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती

पनवेल ः रामप्रहर वृत्त

सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने दरवर्षी शैक्षणिक उपक्रम राबवून गरिब, गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्यात येते. त्या अंतर्गत मंडळाच्या वतीने रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आणि पनवेल महापालिकेच्या गुजराती शाळेत मोफत वह्यावाटप कार्यक्रम गुरुवारी (दि. 28) आयोजित करण्यात आला होता. या वेळी माजी सभागृह नेते परेश ठाकूर आणि माजी नगरसेविका दर्शना भोईर यांच्या हस्ते वह्यांचे वाटप करण्यात आले. या वाटपावेळी विद्यालयाचे चेअरमन जे. एम. म्हात्रे, माजी नगरसेवक अनिल भगत, भावेश चंदने, शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली त्रिवेदी, शिक्षिका डिम्पल ठक्कर, श्वेता मरगज, मौसमी घोडके, सुवर्णा जुनघरे, स्थानिक सल्लागार कमिटी सदस्य मनोहर मुंबईकर यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

Check Also

बॉबी @५३ वर्षे; आजही तारुण्यात असलेला प्रेमपट

चित्रपट रसिकांच्या पिढ्या ओलांडल्या, बदलल्या. चित्रपट पाहण्याच्या पध्दतीत बदल होत गेले, रेडिओ ते यू ट्यूब …

Leave a Reply