कडाव ः वार्ताहर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कर्जत तालुक्यातील आसल ग्रामपंचायतीचे सरपंच रमेश लदगे यांच्या पुढाकाराने सर्व ग्रामपंचायत सदस्य, परिसरातील बांधकाम व्यावसायिक व फॉर्म हाऊसधारकांच्या मदतीने आसल ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासीवाडी, वस्त्या आणि दलित वस्तीतील 350 कुटुंबांना कडधान्यासह जीवनाश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
चिंचवाडी, सागाचीवाडी, बोरीचीवाडी, भूतिवलीवाडी, धामण दांडवाडी, नाण्याचा माळवाडी, आसलवाडी, पाली धनगरवाडा, आसल धनगरवाडा, भूतिवली कातकरवाडी, आसलपाडा कातकरवाडी, आसल दलित वस्ती, वडिवली दलित वस्ती येथील गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. या वेळी सरपंच रमेश लदगे, उपसरपंच उमेश गायकवाड, ग्रामविकास अधिकारी एस. पी. पाटील, ग्रामपंचायत सदस्य दिनकर तळपे, रूपेश कोंढे, नंदिनी शेंडे, वनिता वारगडे, चंद्रकांत सांबरी, करुणा ठाकरे, मंजुळा घोगरकर, कदम आणि ग्रामस्थ सहभागी झाले होते.