Breaking News

बिल्डरकडून होणारी फसवणूक टाळा

पनवेल : प्रतिनिधी : सर्वसामान्य जनतेची घर खरेदीमध्ये बिल्डरकडून फसवणूक होऊ नये यासाठी नैना, सिडको आणि महानगरपालिका हद्दीतील परवाने देणारी कार्यालये दुय्यम निबंधक कार्यालय आणि जिल्हाधिकारी मुद्रांक कार्यालयाला लिंक करण्याची मागणी उसर्ली खुर्द येथील रामचंद्र भगत यांनी निवेदनाद्वारे आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे केली आहे. पनवेल परिसरात अनेक मोठे प्रकल्प येत असल्याने या भागाचे महत्त्व वाढत आहे. त्यामुळे या भागात नागरी वस्ती वाढत आहे. अनेक नवीन गृहप्रकल्पांचे काम येथे सुरू आहे. या प्रकल्पांसाठी नैना, सिडको आणि महानगरपालिका यांच्या ना हरकत दाखल्याची गरज असते. अशा परवानग्या न घेताच अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामे करण्यात आली असून सामान्य माणसाच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्याला खोट्या परवानग्या दाखवून बांधकाम अधिकृत असल्याचे दाखवण्यात येते. प्रत्येकाला आपले स्वतःचे घर असावे, असे वाटत असल्याने आपली साठवलेली पुंजी खर्च करून आणि प्रसंगी पोटाला चिमटा घेऊन कर्ज काढून तो घर घेतो. दुय्यम निबंधक कार्यालयात बांधकाम अधिकृत की अनधिकृत याची खात्री न करता नोंदणी केली जाते. त्यानंतर काही कालावधीने बेकायदेशीर किवा अनधिकृत बांधकाम असल्याची नोटीस संबंधित सिडको, नैना किंवा महापालिका कार्यालयाकडून पाठवण्यात येते. त्या वेळी त्याला फसवले गेल्याची जाणीव होते. त्या धक्क्यातून अनेक वेळा काहींना आपले प्राण गमवावे लागले आहेत. सामान्य माणसाची फसवणूक टाळण्यासाठी  नैना, सिडको आणि महानगरपालिका हद्दीतील अधिकृत बांधकामे दुय्यम निबंधक कार्यालय आणि जिल्हाधिकारी मुद्रांक कार्यालयाला लिंक करण्याची मागणी उसर्ली खुर्द येथील रामचंद्र भगत यांनी निवेदनाद्वारे आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे केली आहे. त्यामुळे या कार्यालयामार्फत त्याची पडताळणी करूनच नोंदणी केली जाईल, त्यामुळे सामान्य माणसाची फसवणूक होणार नाही.

भूलथापा करून लुटणार्‍या त्रिकुटास अटक

पनवेल : वार्ताहर : वयोवृद्ध महिला व पुरुषांना आमच्या मालकांला मुलगा झाल्याने ते गरीब वृद्ध महिलांना पुढे साडी भेट देत आहेत, तसेच फ्रि मेडिकल चेकअप चालू आहे. तुम्ही गरीब दिसण्यासाठी तुमच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून ठेवा अशा प्रकारची बतावणी करून वृद्ध महिला, तसेच पुरुषांना लुटणार्‍या एका टोळीतील काही सदस्यांना गुन्हे शाखा कक्ष-3ने जेरबंद केले आहे. सदर टोळी सक्रिय झाल्याने अनेक गुन्हे वाढले होते. यासंदर्भात कक्ष-3 गुन्हे शाखेचे वपोनि विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि प्रतापराव कदम, पोलीस उपनिरीक्षक अनिल सुरवसे, सुनील सावंत, पोना किशोर बोरसे, नितीन नाईक यांच्या पथकाने अधिक शोध घेत असताना आरोपी राम सीताराम काळे (वय 32, रा. कोळेगाव) याला गुन्ह्यात वापरलेल्या ऑटोरिक्षासह जेरबंद करून त्याचे साथीदार बालाजी चव्हाण व सुरेश काळे यांची नावे निष्पन्न झाली असून कामोठ्यातील 2 गुन्हे, कळंबोली, कोपरखैरणे व एनआरआय सागरी पोलीस ठाणे येथील एक एक गुन्हा त्यांच्याकडून दोन लाख 17 हजार रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला आहे. या सराईत गुन्हेगारांवर गुजरात व महाराष्ट्र राज्यात अनेक गुन्हे दाखल आहेत.

Check Also

हम दिल दे चुके सनम @ 25

उत्कंठामय गोष्ट, देखणं सादरीकरण समीर (सलमान खान) भारतीय शास्त्रीय संगीत शिकण्यासाठी या कलेतील निष्णात पंडित …

Leave a Reply