कामोठे : रामप्रहर वृत्त – कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून लोकांना घरी राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे, तरीसुध्दा लोक काही ना काही कारण काढून घराबाहेर पडत आहेत. म्हणून कामोठेमधील सर्व चौक तसेच मुख्य रोडवर सामाजिक संदेश देणारे पेंटिंग करून जनजागृती केली. तसेच कामोठ्यातील नागरी आरोग्य केंद्रावर सोशल डिस्टन्सिंगचे मार्किंग करून घेतले.त्यासाठी कामोठे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबासाहेब तुपे यांचे बहुमूल्य मार्गदर्शन व सहकार्य लाभले. कामोठे पोलीस स्टेशनच्या परवानगीने तसेच भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा अध्यक्ष श्रीहर्षवर्धन पाटील यांच्या सहकार्याने हे कार्य झाले. या वेळी भाजप कामोठे तालुका मंडल महामंत्री सुशीलकुमार शर्मा हे उपस्थित होते.
Check Also
पनवेलच्या श्लोकची आंतरराष्ट्रीय भरारी!
‘३:३०’ लघुपटाची प्रतिष्ठित फिल्म फेस्टिव्हल्समध्ये निवड; आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून कौतुक व शुभेच्छा पनवेल : …
RamPrahar – The Panvel Daily Paper