पनवेल : शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील मुनोथ इम्प्रेस सोसायटी येथे श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि भाजपच्या वतीने अन्नछत्र सुरू करण्यात आले आहे. या मोदी भोजन कम्युनिटी किचनच्या माध्यमातून दररोज दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंत 300 गरीब, गरजू नागरिकांना मोफत जेवण दिले जात आहे. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबविला जात आहे.
या वेळी आमदार प्रशांत ठाकूर, सभागृह नेते परेश ठाकूर, भाजप शहराध्यक्ष जयंत पगडे, सरचिटणीस व नगरसेवक नितीन पाटील, नगरसेवक अनिल भगत, राजू सोनी, सरचिटणीस अमरिश मोकल, चंद्रकांत मंजुळे, पवन सोनी, राहुल वाहुळकर यांच्या हस्ते सोशल डिस्टन्सिंग पाळून बेघर, मोलमजुरी करणारे व गरजूंना जेवण देण्यात आले. लॉकडाऊन संपेपर्यंत हा उपक्रम सुरू राहणार आहे.
Check Also
अष्टपैलू गायिका आशा भोसले
आशा भोसले… सुरुवात कुठून करावी असा या व्यक्तिमत्वाची खोलवर ओळख करून देताना मला प्रश्न पडतोय …
RamPrahar – The Panvel Daily Paper