Breaking News

पनवेलमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी; मान्यवरांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सोमवारी (दि.19) पनवेलमध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. महापालिकेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या या शिवजयंती उत्सवात शहरातील शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर मिरवणूक काढण्यात आली. या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषणांनी पनवेल दुमदुमली गेली.
भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, माजी महापौर कविता चौतमोल, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे शहराध्यक्ष अनिल भगत, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी, प्रकल्पग्रस्तांचे झुंजार नेते दिवंगत दि.बा.पाटील यांचे पुत्र अतुल पाटील यांच्यासह माजी नगरसेवक, नगरसेविका, विविध संस्था संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून शहरात काढण्यात आलेल्या मिरवणुकीत सहभाग घेतला. त्याचबरोबर या मिरवणुकीत विविध शाळा, संस्थांचे विद्यार्थी, ढोलताशा पथक, लेझीम पथक सहभागी झाले होते. यानिमित्त भारतीय जनता पक्ष प्रभाग क्र. 19च्या वतीने मराठा वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेस प्रतिसाद लाभला.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply