Breaking News

अॅड. दीपाली बांद्रे यांना झाशीची राणी पुरस्कार

ठाणे : प्रतिनिधी

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ठाणे तीन हात नाका येथे कर्तृत्ववान महिलांना झाशीची राणी हा पुरस्कार देऊन भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला. पनवेलमधील अ‍ॅड. दीपाली बांद्रे यांचा पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाला ठाणेच्या महापौर मीनाक्षी शिंदे, नगरसेविका परीशा सरनाईक, संस्थेचे अध्यक्ष अशोक त्रिपाठी, आशुतोष त्रिपाठी, अनंत गोळे, शशी यादव, रमाकांत पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

या वेळी महापौर म्हणाल्या की, दुसर्‍यांच्या स्त्रियांचा सन्मान करणार्‍यांनी प्रथम घरातील स्त्रियांचा सन्मान करणे जरुरीचे आहे. पुरस्कार विजेत्या महिलांनी असे चांगले काम करावे की त्याची प्रेरणा इतर स्त्रियांना मिळेल.  या कार्यक्रमात इंदुमती ठक्कर, फातिमा खान, नूर, निर्मला ठाकूर, स्नेहा  प्रभू आदी महिलांना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमास महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

Check Also

पनवेल मनपा हद्दीतील पाणीपुरवठ्यासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली पाहणी

सर्व कामे 31 मार्चपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका क्षेत्रातील नागरिकांचे …

Leave a Reply